बुधवार, १३ मे, २०२०

निमित्त.... विधान परिषद निवडणुकीचे...


खरे तर 'मोहन' च्या बासरीत खुप ताकद असते. पण 'पुण्य' नगरीतील या मोहनने मागच्या वर्षी मे महिन्यात झालेल्या 'महायुद्धात' 'मैत्री' धर्म पाळताना 'सुदामा'ला अगदी सहजच 'राजसत्ता' बहाल केली. 'सुदामाने' दिलेल्या 'प्रसादा'ची लाज राखली. असे करतांना या मोहनने साक्षात 'दिल्लीचे'

'युवराज' पुण्यनगगरीत आले असतांना प्रचारात सहभागी होण्यास नकार दिला होता असे म्हटले जाते. यांच्या मैत्री धर्माची चर्चा अगदी दिल्लीत ही पोहोचली होती. म्हणूनच या 'मरहट्ट' राज्यातील वरिष्ठांच्या सभागृहात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या मातब्बर सरदारांच्या यादीत यांचेही नाव अग्रस्थानी होते. असे सांगितले जाते की, ही इच्छूकांची यादी समोर आली तेव्हा युवराजांनी प्रश्न विचारला की हेच का ते ज्यांनी माझ्यासोबत प्रचाराला नकार दिला होता? आणि तिथेच त्यांच्या नावावर फुली मारली गेली असे सांगितले जाते.

एक ते 'साहेब' होते, ज्यांनी पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला तर सामान्यातला सामान्य माणूसदेखील - मग तो चपराशी असो, भाजीविक्या असो की भिक्षुकी करणारा ब्राम्हण - राजसत्तेची फळे चाखत असे.

या मोहनने आटपाट 'नगरातील' एका 'साहेबाला' हाताशी धरून खूप प्रयत्न केले. गरज पडलीच तर याच नगरातील कोण्या परिचिताकडून 'मालपाणी'ची व्यवस्था करून ठेवली. पण 'सोनिया'चे दिवस येण्यासाठी केवळ निष्ठा असून चालत नाही, तर प्रामाणिकपणा पाहिजेच. जिथे 'अस्सल' ची गरज असते, तिघे 'तांबे' उपयोगाचे नाही आणि ८० च्या दशकातही 'राजीव'करिश्मा होता आणि यापुढेही 'राजीव' च्या शब्दाला वजन असेल, हा धडा या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाला आहे.

©विवेक भावसार
१३.५.२०२०

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

नागपूरी गर्मी

नागपूरी गर्मी

गण्या - राम राम मन्या, लई दिसांनी भेटला. कुठं व्हतांस? यंदा नागपूरात काँग्रेस मोर्चाने लयी गर्मी आणली असं म्हणत्यात.
मन्या - अरं येडा की खुळा तू. देवेंद्र फडणवीसचं गाव हाय. थंडी आणि गर्मी साक्षात देवेंद्रच्या इशार्यावर चालतात.
गण्या - सावजीचा कडक रस्सा पासून तुझी हगणदारी मुक्ती करेल हा, कोड्यात बोलू नकोस. सरळ सांग.
मन्या - तू म्हणजे इखे -पाटील हाय. पाटील नाव तुला शोभत नाही.
मन्या - म्हणजे?
गण्या - मागच्या वरसला काँग्रेसच्या मोर्चाची कशी वाट्ट लागली होती, काही आहे का ध्यानामंदी?
मन्या - व्हय, आठवतंय की. 5000 टाळकीभी काँग्रेसला जमाता आली नव्हती.
गण्या - आणि यंदा?
मन्या - मोप गर्दी होती. लाख-दिड असाल का रे?
गण्या - ती कितीबी असूदे. सरकारवर त्येचा काय बी असर झाला का?
मन्या - नाही.
गण्या - विचार का नाही झाला?
मन्या - लयी म्हस्का मारतो, आता सांगतो का जाऊ?
गण्या - अशोक चव्हाण सायबाने नांदेडमधून 300 गाड्या आणल्या. नसीम साहेबाने आणि त्यांच्या टीमने मुंबईमधून 50 एक गाड्या आणल्या. नितीनभाऊने विदर्भातून 50 गाड्या आणल्या.
मन्या - गण्या, काहीही फेकू नको. नितीनभाऊ दिल्लीत मंत्री हैत आणि भाजपवाला काँग्रेसला काहून मदत करेल?
गण्या - मन्या, तू लई कच्चा है बे. तूले भाई जगताप नाही तर संजय दत्तकडे शिकवणी लावाया पाहीजे. त्ये बघ, कंच्याबी इशयावर अधिकारवाणीने बोल्तात.
मन्या - मग?
गण्या - वाड्यावरचे नितीनभाऊ नाही, राहूलबाबावाले नितीनभाऊ.
गण्या - आरं, इसरलोच की.
मन्या - आता एवढा मोर्चा काढायचा तर पैका पाहीजे. नादेडच्या साहेबाने हात वर केले. यवतमाळचे भाऊकडे फकस्त इनकमिंग आहे. आऊटगोईंग बंद.
गण्या - लाम्हण लावू नकंस, मुद्याचं बोल
मन्या - तेच सांगतोय, नेत्याने हात वर केला तरी बाकीच्यांनी पैका काढून डोकी जमवली, पण फायदा काही झाला नाही.
गण्या - म्हंजी
मन्या - देवेंद्रभाऊने कर्जमुक्ती काही केली नाही. मी सांगेन ते आणि तेच होईल, इरोधी पक्षाला काय करायचे ते करू द्या, अशी बेटकुळीच भाऊने दाखवली.
गण्या - मंग हवा काय म्हणते
मन्या - मोर्चाने तापवलेल्या हवेतील दम देवेंद्र भाऊने काढून घेतली. नागपूरात बाहेर गर्मी असली तरी काँग्रेस पुरती गारठली ना भाऊ. आमदार 23 ची वाट पाहतांय.
गण्या - काही दम नाही राहीला भाऊ, पण शिवसेनाबी डरकाळी फोडतेय असं एेकलं, खरंय का ते?
गण्या - मन्या तू चैनेल लाव. निखिलभाऊचे नवीन महाराष्ट्र -1 चैनेल सुरू होतंय, त्याच्यावर नजर ठेव. अंगठाछाप सरपंचाने बलावलंय, सेनेच्या वाघिणीवर नंतर बोलू.
राम राम.
मन्या - बरंय, राम राम.

रविवार, १२ जानेवारी, २०१४

गण्या आणि राहूल

चावडी वरच्या गप्पा

गण्या - काय रे मन्या, काय चाललंय तुझं ?
मन्या - का रं बुवा काय झालं ?
गण्या - आरं, कधी कागदं काय टराटरा फाडतो, सरपंचाच्या नावाने बोंबा काय मारतो?
मन्या - मन्या, मग काय करावं मी? यांना एक निर्णय घेत येत नाही.
गण्या - मन्या, तू काय सवताला राहूल गांधी समजतो की काय?
मन्या - आता राहूल बाबाचा आणि माझा काय सबंध? उगा वडाचे पण पिंपळाला लावू नगस.
मन्या - नसे नाही रे बाबा. त्या बाबाने कुठला तरी कागद टराटरा फाडला आणि गल्ली पासून दिल्लीपर्यन्त सारे नेते घाबरले. पीएम शाहेबानी पण निर्णय बदलला.
मन्या - तुला म्हणायचंय काय? कोड्यात बोलू नगस.
गण्या - अरं, बाबा गावकीच्या इरोधात जावू नकोस.
मन्या - का?
गण्या- अरं, तो सरपंच म्हणजे अक्षी अजित दादा सारखा आहे.
मन्या - आता दादा चा हिथं काय संबंध?
गण्या - दादा नाही का बोल्ला, पाठींबा काढून घेईन म्हणून?
मन्या - मग काय हूईल?
गण्या - अरं, तेच्या बिगर तू गावकी चालवू शकशील का?
तुझे मेम्बर किती?
मन्या - मी काय त्याला घाबरतो व्हंय?
गण्या - तसं न्हाय रं ?
मन्या - अरं, मला बी आमदार साहेबाचा पाठींबा हाय. समजतोस काय?
गण्या - तू लई कच्चा हाय.
मन्या - गण्या, लई जास्त बोलू नगस.
गण्या - नाही रं बाबा, तू गुमान शी एम साहेबाचा धडा घे.
मन्या - आता त्यांचे काय?
गण्या - त्यानाबी लई गुरुर, दिल्लीवाले पाठीशी हाय.
मन्या - मग काय झाले?
गण्या - व्हणार काय, पवाराबिगर त्यांचेही पण हलत नाही.
मन्या - तू म्हणतोस त्यात दम हाय गड्या.
गण्या - आता कसे डोस्कं टाळ्यावर आलं.
मन्या - election होवून दे, नंतर बघतो त्या सरपंचाला.